Availability: In Stock

तुम्ही जसा विचार करता | As You Think (Marathi Edition)

Author: James Allen
1
SKU: 978-93-82742-47-0

199.00

Look inside
हे पुस्तक अत्यंत साधे असूनही या गोष्टीची आठवण करून देते की “आपण जे काही मिळवले आहे आणि जे काही मिळवण्यास अपयशी ठरलो आहोत तो सगळा थेट आपल्याच विचारांचा परीणाम असतो.
Read More

‘ॲज यु थिंक’ हे मी वाचलेल्या पुस्तकांपैकी एकमेव शक्तिशाली पुस्तक आहे. त्याने वीस वर्षे माझी सोबत केली आहे आणि त्याने माझे अवघे आयुष्यच बदलून टाकले आहे.’

‘व्हीजनरी बीझनेस’ या पुस्तकाचे लेखक मार्क ॲलन यांच्या प्रस्तावनेतून’

जेम्स ॲलन नावाच्या काहीशा अपरिचित इंग्रज माणसाने १९४० मध्ये ‘ॲज अ मॅन थिंकेथ’ नावाचे छोटे पुस्तक लिहिले. हे पुस्तक जगभरातील सगळ्या ‘स्वयं-सहायक’ पुस्तकापैकी एक महान पुस्तक ठरले. खरेतर स्व:-मदत या शब्दाऐवजी ‘आत्म-सबलीकरण’ संज्ञा वापरणे जास्त उचित होईल. कारण ते आपल्याला फक्त इतकेच दाखवून देत नाही की यशाची गुरुकिल्ली आपल्याच मनात दडलेली असते तर ते आपल्याला हे देखील दाखवून देते की आपण ज्याची कल्पना करू शकु अशा महानतम सिद्धींचा खजिना या गुरुकिल्लीद्वारे कसा उघडता येईल.

या संपादित आवृत्तीत लेखक मार्क ॲलन हे या अभिजात कृतीतील भाषेत थोडा बदल करून तीला अद्ययावत रुप देत आहेत. मुळ पुस्तकातील, प्रचलनात नसलेले शब्द, भाषा बदलून त्यातील संदेशांना अधिक स्पष्टतेची धार चढवली आहे. त्यांनी या पुस्तकाद्वारे दाखवून दिले आहे की ही तत्त्वे, हे सिद्धांत खरोखरच कशी सार्वत्रिक आहेत आणि ती प्रत्येकाला सारखीच लागू पडतात मग त्या व्यक्तीचे लींग, वय, वंश, धर्म, सामाजिक दर्जा किंवा शिक्षण काहीही असो.

हे पुस्तक अत्यंत साधे असूनही या गोष्टीची आठवण करून देते की “आपण जे काही मिळवले आहे आणि जे काही मिळवण्यास अपयशी ठरलो आहोत तो सगळा थेट आपल्याच विचारांचा परीणाम असतो.”

आपणच आपल्या नियतिचे धनी, आपले भाग्यविधाता असतो.

Author: James Allen