Description
अद्वैत तत्त्वज्ञानी रमेश बालसेकर यांना गौतम सचदेवा पहिल्या प्रथम फेब्रुवारी २००० साली भेटला. नऊ वर्षांच्या काळात तो प्रकाशक म्हणून काम करू लागला व रमेश यांच्या बरोबर त्यांची काही पुस्तके प्रकाशित करण्याचे काम करू लागला.
रमेश यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून मे २००७ मध्ये भारतातील एका प्रसिद्ध ‘लाईफ पॉझिटीव्ह’ या धार्मिक मासिकांत एक लेख गौतमने लिहिला. या लेखाला वाचकांनी दिला, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रमेश यांच्या सूचनेप्रमाणे गौतम यांनी एक पुस्तिका तयार केली. गौतमने रमेश यांच्या जगातील सर्व चाहत्यांना सकाळी दिल्या जाणाऱ्या प्रवचनातून सांगितलेला व त्यांच्या शिकवणीचा गाभा म्हणता येईल असा भाग समाविष्ट केला.
रमेश यांची बरीचशी पुस्तके त्यांच्या हस्तलिखितावरुन किंवा चाहत्यांच्या बरोबर झालेल्या संवादावर आधारित माहितीवरुन प्रकाशित केली गेली. प्रस्तुतचे पुस्तक हे म्हणजे रमेश यांच्या प्रवचनातील मुख्य कल्पनांची गोळा बेरीज आहे. जणू काही एखाद्या सकाळच्या संपूर्ण प्रवचनातून ते संचार करत आहेत.
हे सर्व ‘रमेश बालसेकर यांची मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकाबद्दल जीवनातील परिस्थिती, सुख आणि दु:ख यांना समभावाने आणि शांत मनाने कसे हाताळायचे ह्याबद्दलची जगप्रसिद्ध अद्वैत तत्त्वज्ञानी यांची ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
Reviews
There are no reviews yet.