Description
“त्यांच्यामधील (कुंडलिनी शक्तिची) जागृति आणि ध्यानाची साधना यामुळे परमशांति, प्रज्ञा आणि जाणीव यांचे प्रगटीकरण त्यांच्यामध्ये झाले आहे आणि या तिन्हीहि गुणांची प्रचिती या पुस्तकात आपल्या दृष्टोत्पत्तीस येते.”
– सुमा वर्गिस, संपादक, ‘लाईफ पॉझीटिव मॅग्झीन’
कुंडलिनी शक्तिची जागृति होत असताना ध्यानामध्ये साधकाला असामान्य अनुभव येतात आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. संतोष सचदेवा त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा ‘कुंडलिनी मेडीटेशन – प्रश्नोत्तरे, भाग-२’ यामधून तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतात. ‘कुंडलिनी मेडीटेशन – प्रश्नोत्तरे, भाग-१’ या पुस्तकाप्रमाणेच हे दुसरे पुस्तकहि कुंडलिनी संबंधित लेखनामध्ये असामान्य अशी भर घालते. त्याच्या स्वत:च्या शांत शैलीत संतोष या शक्तिशाली महाशक्तिचे म्हणजे कुंडलिनीचे अंतर्यामी होणारे कार्य विषद करतात.
या पुस्तकांत यापेक्षाहि काहितरी जास्त आहे. एखादा प्रश्न किंवा प्रसंग कदाचित तुमच्याशी संबंधीत असणारा, तुम्ही त्याला जोडू शकता आणि त्यामुळे तुमच्या शंका निरसन होतील व तुमची आध्यात्मिक प्रगति होईल. ‘कुंडलिनी मेडीटेशन – भाग-२’ हे पुस्तक ह्या अशा गोष्टी स्पष्टपणे व अधिक सखोलतेने करते.
संतोष सचदेवा ह्या ‘दि कुंडलिनी ट्रिलोजी’ ज्यामध्ये ‘काँशस फ्लाईट इनटू द ऐम्पेरियन’, ‘कुंडलिनी डायरी’ आणि ‘कुंडलिनी अवेकनिंग’ या तीन पुस्तकांचा समावेश आहे. ही तीन पुस्तके म्हणजे फक्त एक मोठा सहभाग नसून, त्यात असमान्य अशा शक्तिशाली कुंडलिनी शक्तिच्या जागृतिचे सचित्र वर्णन आहे.
Reviews
There are no reviews yet.