Description
त्यांचे लेखन बर्याच वर्षांच्या कुंडलिनी बद्दलच्या अनुभवांचे फलित आहे कुंडलिनीच्या प्राथमिक जागृति अवस्थेपासून ते निर्णायक अवस्थेपर्यंत प्रगतिच्या प्रक्रिये पर्यंत उत्तरोत्तर वाढत जाऊन पूर्णत्वाचा भाग होतो.
– मि. मास्टर चार्लस् कॅनन यांच्या प्रस्तावनेतून
आजच्या जगांत नेहमी प्रगत होत जाणारी जाणीव, कुंडलिनी शक्ति जागृत होण्याची क्रिया आणि नेहमी पेक्षा वेगळे असणारे त्या अनुशंगाने येणारे यांच्या प्रक्रियेमधून प्रकट होणारे अनुभव मोठ्या प्रमाणात अनुभवास येतात. तरीसुद्धा बरेच प्रश्न आणि चुकीच्या समजूती शिल्लक राहतात. त्यातील काही अनुभवांची आणि शंकांची – ज्या शंका अशा तर्हेच्या आध्यात्मिक सरावांत उद्भभवतात – त्यांची उत्तरे हे पुस्तक देईल. या पुस्तकात विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे ही प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगातून उद्भभवलेली आहेत.
संतोष सचदेवा यांना कुंडलिनी शक्तिच्या प्रक्रियेवद्दल उत्कट अनुभव आले आहेत. याबद्दलचे लेखन त्यांनी त्यांच्या ‘काँशस फ्लाईट इन टू दि एंपिरियन’, ‘कुंडलिनी डायरी’ व ‘कुंडलिनी अवेकनिंग’ या तीन पुस्तकांचे एकत्र केलेल्या ‘द कुंडलिनी ट्रिलॉजी’, यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ही तिन्ही पुस्तके त्यातील कुंडलिनीची प्रक्रिया उलगडून दाखवणारी त्यातील अपूर्व चित्रे यामुळे कुंडलिनी संबंधीच्या वाङमयाला अद्वितीय व अभूतपूर्ण अशी मिळालेली एक देणगीच आहे. हे पुस्तक म्हणजे परत एकदा अपूर्व अशी कुंडलिनी संबंधीच्या लेखनामध्ये घातलेली भर आहे. कारण या आधी अशा तर्हेचे विश्वसनीय व प्रमाणित ज्ञान फक्त योगी लोकांकडेच मिळत असे. या पुस्तकात विशेष असे काहीतरी आहे. प्रश्न किंवा अनुभव, तुम्हाला असणारी एखादी शंका तुम्ही त्या प्रश्नाशी जोडू शकाल. अशी आशा आहे कि ते उत्तर तुम्हाला तुमच्या पुढील आध्यात्मिक प्रवासात उपयोगी पडेल.
मास्टर चार्लस् कॅनन, अमेरिकन द्रष्टा आणि श्रेष्ठ सिद्ध योगी स्वामी मुक्तानंद परमहंस यांचे शिष्य यांनी दिलेली समर्पक स्पष्टीकरणे या पुस्तकात समाविष्ट केल्यामुळे या विषयीचा सध्याच्या काळातील दृष्टिकोन समजतो.
जर तुम्ही हे पुस्तक घेतले असेल तर तुम्ही बहुधा कुंडलिनी जागृतिच्या कोठल्यातरी एका टप्प्यावर आहात आणि तुम्ही कांही उत्तरे शोधत असाल, तसेच तीच्या जागृतीच्या प्रक्रियेबद्दल खात्रीपूर्वक माहिती मिळवू इच्छित असाल तर कांही प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आढळतील.
Reviews
There are no reviews yet.