Description
“आनंदी राहाणे हाच जीवनाचा खरा उद्देश आहे”
प. पू. दलाई लामा यांच्या ‘व्हायसेस फ्रॉम द हार्ट’ या पुस्तकातून
मनुष्य हा त्याच्या परिस्थितीचा गुलाम आहे का? आधुनिक विचारवंताचा असा विश्वास आहे कि एखाद्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक मार्ग आहे किंवा तो त्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
तुमची महत्वाकांक्षा प्रत्यक्षांत उतरवण्यासाठी तीन स्थरावर आधारित पध्दत तुम्ही अमलात आणली पाहिजे.
प्रथम विचार करा, तशी भावना करा आणि त्याप्रमाणे कृति करा.
प्रत्येक विचाराला एक आकार असतो, आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमताही त्या विचारात असते, तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनाने तुम्हाला वळण लावा. याचा अर्थ असा कि सकारात्मक बोधवचनाच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मनाला वळण लाविले पाहिजे.
पुरातन तिबेटी विचार सरणीने आपल्याला ‘९ सकारात्मक तत्त्वे’ दिली आहेत. ह्या बोधवचनांमुळे तुमची ओळख खोलवर होऊन तुमचे पूर्ण जाणीवेशी असणारे तुमचे नाते तुम्ही अनुभवू शकाल.
Reviews
There are no reviews yet.